नमस्कार शेतकरी मित्रानो,  या ब्लॉगमध्ये आपण अन्नघटकांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना कोणत्या कराव्यात ?  याविषयी माहिती जाणुन घेणार आहोत. पिक उत्पादनामध्ये
अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे जाणुन घेणे सुध्दा खुप महत्वाचे आहे. हि कमतरतेची लक्षणे आपल्याला ओळखता आली तर त्याप्रमाणे आपण उपाय योजना करुन संभाव्य होणारे नुकसान टाळु शकतो आणि शेतीतील पिकाचे उत्पादन वाढवु शकतो.

अन्नघटकांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना कोणत्या कराव्यात ? हे जाणुन घेण्यासाठी खालील तक्त्याचे बारकाईने वाचन करावे

अ.क्र.

अन्नघटक

कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे

उपाययोजना

1

नत्र

मुळाची व झाडाची वाढ थांबते, फुट व फळे कमी येतात. पिकाची खालील पाने पिवळी पडतात.

1 टक्के युरिआची फवारणी करावी.

( 100 ग्रॅम युरीआ + 10 लिटर पाण्यातुन )

2

स्फुरद

पानाची मागील बाजु जांभळट होते. पाने हिरवट लांबट होतात आणि पिकाची वाढ खुंटते.

1 ते 2 टक्के डाय अमोनिअम फॉस्फेटची फवारणी करावी. ( 100 ते 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातुन )

3

पालाश

पानांच्या कडा तांबटसर होऊन पानावर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.

1 टक्के सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी. ( 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातुन )

4

लोह

शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो. झाडांची वाढ खुंटते.

25 कि.ग्रॅ. फेरस सल्फेट जमिनितुन
शेणखतासोबत द्यावे किंवा 0.2 टक्के चिलेटेड लोहाची फवारणी करावी.

5

बोरॉन

झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन झाडे मरतात. सुरकुत्या पडुन पिवळे पट्टे पडतात. फळावर तांबडे ठिपके पडुन फळांना भेगा पडतात.

50 ग्रॅम बोरिक ॲसिड पावडरची 10 लिटर पाण्यातुन पानावर फवारणी करावी.

6

जस्त

पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. तसेच पाने लहान होतात, आणि शिरांमधील भाग पिवळा होतो.

हेक्टरी 10 ते 20 कि.ग्रॅ. झिंक
सल्फेट जमिनितुन शेणखतासोबत द्यावे किंवा 0.2 टक्के चिलेटेड झिंकची पिकावर फवारणी करावी

7

मंगल

झाडाचे संपुर्ण पान फिकट होते व नंतर पान गळुन पडते. तसेच पानांच्या शिरा हिरव्या व शिरामधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होऊन नंतर पांढरट करडा होतो.

मॅंगनिज सल्फेट हेक्टरी 10 ते
25 कि.ग्रॅ. जमिनितुन शेणखतासोबत द्यावे किंवा 0.2 टक्के चिलेटेड मंगलची पिकावर फवारणी करावी.( 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यातुन)

8

मॉलिब्डेनम

पानाच्या मागील बाजुन तपकिरी डींकासारखा द्रव स्त्रवतो. शिवाय पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात.

सोडियम मॉलिडेट हेक्टरी पाव ते
अर्धा कि.ग्रॅ. जमिनितुन द्यावे

9

तांबे

झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते,
झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो. खोडाची वाढ कमी होते. पाने लगेच गळतात.

मोरचुद 40 ग्रॅम 10 लिटर पाण्यात
मिसळुन फवारणी करावी .

10

गंधक

झाडांच्या पानांचा मुळचा हिरवा
रंग कमी कमी होतो व नंतर पाने  पुर्ण पिवळी
पांढरी पडतात.

गंधक  जमिनितुन शेणखतासोबत हेक्टरी 20 ते 40 कि.ग्रॅ.
द्यावे.

या तक्त्याचे बारकाईने वाचन केल्यास अन्नघटकांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना कोणत्या कराव्यात ?  आपल्या लक्षात येईल व त्याप्रमाणे आपल्याला अन्नद्रव्यांचे नियोजन करता येईल.

 

 

धन्यवाद !

Techno
Sheti