जमिनिचे आरोग्य व्यवस्थापन अर्थात माती परिक्षणाचे महत्व

 

 

 आरोग्य व्यवस्थापन अर्थात मातीपरिक्षणाचे महत्व

 

         शेतकरी मित्रानो,  या लेखामध्ये आपण जमिनिचे आरोग्य व्यवस्थापन अर्थात मातीपरिक्षणाचे महत्व समजुन त्याआधारे अन्नद्रव्याचे व्यवस्थापन याविषयी माहिती जाणुन घेणार आहोत. 

मातीपरीक्षण केल्याचे महत्व  :-

ज्याप्रमाणे आपण आपले आरोग्य निरोगी राहावे म्ह्णुन दवाखान्यात जावुन डॉक्टर सांगतील त्या प्रकारच्या तपासण्या करुन घेतो आणि आपले शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो, अगदी त्याप्रमाणेच ज्या जमिनितुन आपण भरघोस पिक घेवुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो त्या जमिनिचे अर्थात आपल्या भुमातेचे आरोग्य अबाधित ठेवणे देखील आपले कर्तव्य आहे. अयोग्य आणि असमतोल खतांच्या वापरामुळे जमिन आजारी अवस्थेत चालली आहे. परिणामी ती अन्नद्र्व्यांना देखील प्रतिसाद देत नाही त्यामुळे शेतीचा खर्च वाढुन आपल्या जमिनितुन अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणुन पिकांची आणि जमिनिची अन्नद्र्वांची
गरज ओळखुन त्याप्रमाणे खतांचे व्यवस्थापन केले तर निश्चितपणे आपल्याला अपेक्षित असे उत्पन्न मिळेल यात शंका नाही. म्ह्णुन भविष्यात जमिनिचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणुन माती परिक्षण करुन घेणे फार महत्वाचे आहे.

माती परीक्षण केल्याने…

·        जमिनितील अन्नघटकांचे प्रमाण समजते.

·        अन्नघटकांचे प्रमाण समजल्यामुळे त्याप्रमाणे खतांचे नियोजन करुन पिकांच्या गरजेनुसार खतमात्रा देवुन अन्नद्र्वांचा समतोल साधता येतो.

·        शिफारशीत खतमात्रा दिल्याने अवास्तवपणा टाळता येतो.

·        जमिनिची सुपिकता वाढ्विता येते.

·        जमिनिमधीलरासायनिक, भौतिक तसेच जैविक गुणधर्म याची माहिती मिळते.

·        शेत जमिन आम्ल / विम्ल युक्त आहे का? याची माहिती होऊन सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करता येतात.

·         शेती करतांना
जमिन आणि पाण्याला फार महत्व आहे. आणि या निसर्ग दत्त साधनांचा वापर तोलुन मापुन केला
पाहिजे. तरच ही धरणी माता आपल्याला अपेक्षित उत्पादन देईल.

या भुमातेचे आपल्या मानवावर व संबंध सृष्टीवर असलेलेऋण फेडण्यासाठी तिला जिवंत ठेवणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी माती परिक्षण करुन तिचेआरोग्य अबाधित ठेवणे ही काळाची गरज आहे.

पिकांना आवश्यक असणारी 16 अन्नद्रव्ये

मुख्य अन्नद्रव्ये :-

1)  हायड्रोजन (H2) 2) ऑक्सिजन (O)   3) कार्बन (C)  4) नत्र (N ) 5) स्फुरद
(P
2O5)

दुय्यम अन्नद्र्व्य :-

1)  कॅलशियम ( c)  2) मॅग्नेशियम
(Mg) 3) गंधक (S)

सुक्ष्म अनन्द्रव्ये :-

1)  लोह (Fe)

2) मंगल ( Mn)

3) तांबे (Cu)

4) जस्त(Zn)

5) मॉलिब्डेनम (Mo)  

6) बोरॉन (B) 7) क्लोरिन(CI2)

मातीपरिक्षण करण्यासाठी माती नमुना कसा घ्याल?

  • Ø   मातीनमुना हा एखाद्या क्षेत्राचा प्रातिनिक स्वरुपाचा असावा त्यासाठीतो काळजीपुर्वक काढणे आवश्यक आहे.
  • Ø एखाद्या शेतामध्ये गेल्यावर त्या शेताची पाहणी करुन जमिनिचा प्रकार रंग, उतार, सखलपणा, पिके, विहिर, गोठा, दलदलपणा, खोली इत्यादी विचार करुन झिगझॅग पध्दतीनेत्या क्षेत्राची विभागणी करावी.
  •  
 आरोग्य व्यवस्थापन अर्थात मातीपरिक्षणाचे महत्व

 

  • वरील चित्रामध्ये दर्शवल्याप्रमाणे  शेताची काल्पनिक 7 ते 8 ठिकाणी  विभागणी झाल्यावर प्रत्यक्ष मातीनमुने काढण्यासाठीइंग्रजी ‘Vआकाराचा खड्डा प्रत्येक ठिकाणी घेण्यात यावा.
  • खड्ड्यातील माती बाहेर काढुन टाकावी. व कडाची दोन्ही बाजुची माती 2 सेँ.मी वरपासुन खालपर्यंत खरवडुन काढावी.
  • फळबागेसाठी माती परिक्षण करावयाचे असल्यास 100 सें.मी. ‘V’ आकाराचा खोल खड्डा घ्यावा व इतर पिकांच्या बाबतीत 30 सें.मी.  ‘V’ आकाराचा खड्डा घ्यावा.
  •  ही सर्व 7 ते 8 ठिकाणची  माती एकत्र गोळा करुन गोणपाटावर  खाली दर्शवल्याप्रमाणे ठिग करुन त्याचे चार समान भाग करुन त्याला 1 ते 4 क्रमांक द्यावेत.
  • Ø  या 1 ते 4 ठिगामधुन समोरासमोरील दुसरा आणि चौथा भाग ठेवुन पहिला आणि तिसरा भाग बाजुला काढुन टाकावा.
  • Ø   त्यानंतर राहिलेला दुसरा आणि चौथा भाग एकत्र करुन पुन्हा त्याचे चार समान भाग करुन त्याला 1 ते 4 क्रमांक देवुन हि प्रक्रिया जोपर्यंत 500 ग्रॅम माती शिल्लक राहिल तोपर्यंत करावी.

 

मातीनमुना घेतांना कोणती काळजी घ्यावी?

·   शेतात जनावरे बसण्याची जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, विहिरी जवळ किंवा शेतीचे बांध, दलदलीची जागा, झाडाखालची जागा, उकिरडा इ ठिकाणाहुन माती नमुना घेवु नये.

· मातीचा नमुना पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणी पुर्वी घ्यावा. शेतात पिक असल्यास दोन ओळीतील जागेतुन घ्यावा.

· पिकास रासायनिक खत दिले असल्यास 2 ते 2.5 महिन्यानंतर माती नमुना घ्यावा. त्याच्या आत घेवु नये.

· निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळु नयेत.

· माती नमुना प्रयोगशाळेत पाठवित असतांना रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करु नये. स्वच्छ पिशवीचा वापर करावा.

·  मातीनमुना घेतांना अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी.

मातीचा नमुना खालील माहीतीसह जवळच्या प्रयोगशाळेत पाठवावा.

1)  शेतक-याचे पुर्ण नाव :-

2)  पुर्ण पत्ता( मोबाईल क्रमांकसह ) : –

3)  गट नंबर / सर्वे नंबर :-

4)  शेतीचा प्रकार – (बागायत / जिरायत)

5)  ओलिताचे साधन :- (विहिर / बोअर वेल / पाण्याचा पाट वगैरे)

6)  जमिनिचा निचरा :- (चांगला / मध्यम / कमी )

7)  जमिनिचा प्रकार :- (वाळु / पोयटा / चिकणमाती / क्षारयुक्त/ चोपण /
चुनखडीयुक्त )

8)  जमिनिचा उतार :- ( जास्त / मध्यम / सपाट )

9)  जमिनिची खोली :- (उथळ – 25 सेमी., मध्यम – 25 ते 50 सेमी, खोल –
50 ते 100 सेमी., अतिखोल – 100 सेमी पेक्षा जास्त )

10)    मागील हंगामात घेतलेले पिक व त्याचे उत्पादन  :-

11)    मागील हंगामात पिकास वापरलेली सेंद्रिय व रासायनिक खते व त्याचे प्रमाण
:-

12)    पुढील हंगामात घ्यावयाची पिके व त्याचे वाण :-

माती व पाणी परीक्षण करण्यासाठी शुल्क :-

अक्र.

तपासणी
प्रकार

तपसणी
शुल्क

1

सर्वसाधारण
माती नमुना

35
रु.

2

विशेष
माती नमुना

275
रु.

3

सुक्ष्म
माती नमुना

200
रु.

4

पाणी
नमुना ( फक्त शेतीसाठी )

50
रु.

जमिनितील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरुन करावयाच्या खतांचा वापर

माती परिक्षण अहवालानुसार वरील तक्त्याचा उपयोग करुन अन्नद्रव्याचे वर्गीकरण करावे व त्यानुसार खतांची मात्रा द्यावी.

    आपल्याला हा लेख कसा वाटला किंवा आपल्या
काही
 सुचना असल्यास नक्की कळवा.

 

 

धन्यवाद !

Techno
Sheti

 

Leave a Comment